इतके दिवस, अं-- दिवस कुठले बरोबर नऊ महिने हा आठवणींचा पसारा आवरते आहे तुमच्या साक्षीने! तुमचा निरोपही एका हळव्या क्षणी घेतला पण हेही तितकेच ! खरतर तुम्हाला बरोबर घेऊन कधी तुमच्या देखरेखीखाली तर कधी सोबतीने आठवणींचा पसारा आवरणे एक सुखद स्वप्न होते. तुम्हाला भेटल्याखेरीज रहाणं मला तरी अशक्य वाटतय म्हणून मी परत भेटायला येते आहे पण आवरायला पसारा घेऊन नाही तर मुक्त चिंतन करायला. गप्पा मारायला. परत नियमित भेटू या. धन्यवाद